नेत्रदान पुण्य महान

ज्या लोकांना बुब्बुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे, अशा लोकांना नेत्रदानाचा फायदा होतो. त्यालाच कॉर्नियल ब्लाइंडनेस असे म्हणतात. नेत्रदानानंतर केवळ डोळयाच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते, पूर्ण डोळा बदलला जात नाही.

बुब्बुळ (कॉर्निया) म्हणजे काय?

eyes

घडळयाच्या तबकडीवर ज्याप्रमाणे संरक्षक काच असते, त्याचप्रमाणे डोळयामध्ये पूर्ण पारदर्शक आवरण असते. त्यामुळे डोळयांचे संरक्षण होते. मुख्यत: बाहेरील प्रकाशकिरण डोळयात जाऊन दृष्टी प्राप्त होते. ज्यावेळी हे पारदर्शक बुब्बुळ अपारदर्शक होते, तेव्हा साहजिकच अंधत्व येते.

या अंधत्वाची कारणे –

 • १. डोळयाला होणारी इजा उदा. बुब्बुळाला होणार्‍या जखमा, दिवाळीमध्ये असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके
 • २. कुपोषणामुळे
 • ३. इन्फेक्शन (जंतू प्रादुर्भाव) मुळे
 • ४. देवी, कांजिण्या, इ. विकारामुळे
 • ५. डोळयात काही केमिकल्स गेल्यास
 • ६. अनुवांशिकता

नेत्रदान कोण करू शकतो?

 • १. नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते.
 • २. बालकापसून वृध्दांपर्यत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.
 • ३. ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात.
 • ४. ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, इ. विकार असतील ते सुध्दा नेत्रदान करू शकतात.
 • ५. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती.
 • ६. नेत्रदानास कुठल्याही धर्माचा विरोध नाही.

नेत्रदान कोण करू शकत नाही?

 • १. एड्स,
 • २. हिपाटेटिस (ल्व्हिरचे आजार),
 • ३. सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव),
 • ४. ब्लड कॅन्सर, इ. चे रुग्ण

नेत्रदानाचे वेळी घ्यावयाची काळजी –

 • १. मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे, तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रूमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी.
 • २. आपल्या डॉक्टरकडून डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) तयार ठेवावा.
 • ३. डोळयातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाचे आत काढावे लागतात. त्यामुळे जवळील नेत्रपेढीस त्वरित फोन करून कळवावे.
 • ४. जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते.

नेत्रपेढीचे काम –

 • १. नेत्रदानाचा फोन आल्याबरोबर नेत्रपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन रुग्णाचे बुब्बुळे काढून नेतात. त्यावेळी नेत्रदात्याचे रक्तही तपासणीसाठी काढले जाते.
 • २. नेत्रदानाने चेहरा विद्रूप होत नाही.
 • ३. दान केलेले नेत्र सुरक्षित रित्या नेत्रपेढीत नेऊन त्याची तपासणी करून योग्य त्या रुग्णावर आरोपण केले जाते.

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. तरी आजच नेत्रदानाचा संकल्प सोडा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा.

Donor Pledge

Donor Pledge
Membership Form

Lifetime Membership Application